लोकल प्रवासासाठी तयार होतायेत खोटी ओळखप़त्र, लोकलच्या गर्दीत भर..

मुंबई गाठण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागत आहे. वाहतुकीची मर्यादीत साधने उपलब्ध असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. परंतु सर्वसामान्यांना अद्यापपर्यंत लोकल प्रवासाची (local train) परवानगी दिलेली नाही. परंतु काही जणं लोकल प्रवासासाठी खोटी ओळखपत्र तयार करत (False identity cards are being prepared for local travel) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकलमध्ये विनाकरण गर्दीत (crowded ) भर होत आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, विरार, पालघर या पट्टयातील नोकरदार वर्गाला दररोज मुंबई (Mumbai) गाठताना अक्षरक्ष: नाकीनऊ येत आहेत. मुंबई गाठण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागत आहे. वाहतुकीची मर्यादीत साधने उपलब्ध असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. परंतु सर्वसामान्यांना अद्यापपर्यंत लोकल प्रवासाची (local train) परवानगी दिलेली नाही. परंतु काही जणं लोकल प्रवासासाठी खोटी ओळखपत्र तयार करत (False identity cards are being prepared for local travel) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकलमध्ये विनाकरण गर्दीत (crowded ) भर होत आहे.

राज्य सरकारने खासगी कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. पण खासागी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नाहीये. त्यामुळे या कर्मचारी वर्गाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजांच्यावेळात बदल झाला तर, लोकलमध्ये गर्दी कमी होईल. त्यानंतर खासगी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देऊ शकतो, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी आहे. सध्या मुंबईत सरकारी कर्मचारी, हॉस्पिटल स्टाफ, बँक आणि विमा कर्मचाऱ्यांना ट्रेन प्रवासाची परवानगी आहे. तसेच पुढील महिन्यात मुंबईतील लोकल सेवा व कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.