Family get together Sharad Pawar's birthday celebration; Special photo shared by Supriya Sule on Instagram

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. खासदार सुप्रिया सुळेंनी फॅमिली गेट टू गेदरचे फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. कुटुंबीयांनी पवारांचे औक्षण करुन दिर्घायुष्याची प्रार्थना केली. यावेळी पवार कुटुंबियांनी एकत्रीत वेळ घालवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात राष्ट्रवादीच्यावतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने दुपारी वाय.बी. चव्हाण सभागृहात ८ दशकं कृतज्ञतेची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.