कोरोना वॉर्डमध्ये डॉक्टरच्या डोक्यावर फॅन पडला – नायर रुग्णालयातील घटना

मुंबई: मुंबईपालिकेच्या नायर रुग्णालयातील कोरोना वॉर्डात ड्युटीवर असलेल्या डॉक्टरच्या डोक्यावर फॅन पडला. यामुळे तो डॉक्टर जखमी झाला. त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. आता त्या डॉक्टरची

 मुंबई: मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयातील कोरोना वॉर्डात ड्युटीवर असलेल्या डॉक्टरच्या डोक्यावर फॅन पडला. यामुळे तो डॉक्टर जखमी झाला. त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. आता त्या डॉक्टरची प्रकृती स्थिर असल्याचे स्थानिक मार्डकडून सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. सिलिंग फॅन अचानक निखळून डॉक्टरवर आदळला. रुग्णसेवेत असलेल्या हा डॉक्टर चक्कर येऊन जमिनीवर पडला. सहकारी डॉक्टरांच्या‌ मदतीने त्यांना अत्यावश्यक वॉर्डात दाखल केले. जखमेतून रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांचे सिटी स्कॅन करण्यात आले असल्याचे स्थानिक मार्डकडून सांगण्यात आले. सध्या उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

कोरोना ड्युटीसाठी डॉक्टरांचा तुटवडा भासत असतानाच अशी घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, डॉक्टर उपचारानंतर पुन्हा कोरोना रुग्ण सेवेत रुजू झाला असल्याचे नायर अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.