सोनू सूदला भेटायला बिहारवरून सायकलने निघाला चाहता; सोनूने जे केले ते आश्चर्यकारक होते

मुंबई. अभिनेता सोनू सूद याने कोरोना काळात केलेल्या मदतकार्यामुळे सर्वसामान्यांच्या हृदयात खरा खुरा हिरो म्हणून स्थान निर्माण केले आहे. सोनूच्या मदत कार्यामुळे त्याच्या चाहत्यातही मोठी भर पडली आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार राहतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. सोनूचा एक चाहता त्याला मिठी मारण्यासाठी बिहारवरून चक्क सायलाकने प्रवास करीत मुंबईला येण्यासाठी निघाला होता.

अरमान नावाचा हा चाहता वाराणसी पर्यंत पोहोचल्याचे कळताच सोनूने त्याला फोन केला व वाराणसीवरून विमानाने येण्याची विनंती केली. सोनू म्हणाला की, मला भेटायची तुमची इच्छा मी समजू शकतो परंतु सायकलने इतका प्रवास करणे योग्य नाही. त्यामुळे सोनूने अरमानसाठी वाराणसीवरून विमानाचे तिकीट बुक केले. इतकेच काय तर त्याच्या राहण्यासही व्यवस्था एका एका हॉटेलमध्ये केली.

अरमानसोबत झालेल्या भेटीनंतर सोनूने पुन्हा तत्याला विमानाने पटणाला पाठविले, इतकेच काय तर त्याची सायकलसुद्धा विमानाने वापस पाठविली. त्याची ही कामगिरी बघून सामान्यांच्या मनात सोनूबद्दलची आपुलकी आणखीनच वाढली आहे.