Pawar-Thackeray worried about winning the mini assembly seat

कृषी काद्यावरुन सुरु असलेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार कृषी कायद्याविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील ५२ दिवसांपासून शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. अनेक बैठका होऊन अद्याप तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत.

मुंबई : कृषी काद्यावरुन सुरु असलेला वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार कृषी कायद्याविरुद्ध राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील ५२ दिवसांपासून शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. अनेक बैठका होऊन अद्याप तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत.

अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. केंद्राच्या तिनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकत्र आहेत. तिनही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं नवाब मलिक म्हणाले.

शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत कृषी कायद्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनीही आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर सातत्याने टीकास्त्र डागलं आहे.

केंद्र सरकारला कृषी कायदे परत घ्यावेच लागतील, असा ठाम विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात खुद्द मुख्यमंत्री आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार असल्यानं कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.