किसान सभेचा शेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल, शरद पवार होणार सहभागी

विशेषतः आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला असून नाशिककडून मुंबईकडे कूच केली. मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) या मोर्चात सहभागी होऊन आपली भूमिका या आंदोलनाच्या व्यासपीठावरून स्पष्ट करणार आहेत. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत.

दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात आयोजित करणात आलेला शेतकरी मोर्चा काल (रविवारी) रात्री उशिरा मुंबईत पोहोचला. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला नैतिक पाठिंबा आणि बळ देण्यासाठी नाशिकपासून या मोर्चाला सुरुवात झालीय.

विशेषतः आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला असून नाशिककडून मुंबईकडे कूच केली. मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) या मोर्चात सहभागी होऊन आपली भूमिका या आंदोलनाच्या व्यासपीठावरून स्पष्ट करणार आहेत. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सुमारे ४५० वाहनांनी २० हजार शेतकरी मुंबईत दाखल झालेत.

२३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत दिल्लीतील मोर्चाला अधिक बळ देण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय. विविध शेतकरी संघटना आणि पक्षांशी संबंधित शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. सुमारे ६००० शेतकरी यात सहभागी झाले असून सोमवारी अधिक शेतकरी मुंबईत दाखल होतील, असं सांगितलं जातंय. राजकीय पक्षांचे कार्यकर्तेदेखील या मोर्चात सहभागी होणार असून शेतकरी संघटना आणि कृषी कायद्यांना विरोध करणारे राजकीय पक्ष एका व्यासपीठावर येणार आहेत.