गृहमंत्री देशमुख जाणार की राहणार? आज होणार फैसला, ठाकरे-पवार बैठकीत होणार निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (सोमवार) एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं त्यांच्या पक्षाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला होता. आता या प्रकऱणात उद्धव ठाकरे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत आग्रही राहतात का, हे पाहणंदेखील महत्त्वाचं असणार आहे. 

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र पाठवून केलेल्या आरोपानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होऊ लागलीय. जर मुंंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्र्यांच्या आदेशावरून पोलीस वसुली करत असल्याचा आरोप करत असतील, तर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपनं लावून धरलीय.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (सोमवार) एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेनं त्यांच्या पक्षाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला होता. आता या प्रकऱणात उद्धव ठाकरे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत आग्रही राहतात का, हे पाहणंदेखील महत्त्वाचं असणार आहे.

    दरम्यान, रविवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने अनिल देशमुख यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. पोलीस आय़ुक्तपदावरून बदली झाल्याच्या रागातूनच परमबीर सिंगांनी हे आरोप केले असल्यामुळे देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.

    सचिन वाझे प्रकरण सुरुवातीला शिवसेनेशी संबंधित वाटत होतं. सचिन वाझे यांचा शिवसेनेशी असणारा संबंध आणि अंबानींच्या घराजवळ उभी असणारी स्फोटकांची गाडी या मुद्द्यापुरतं मर्यादित होतं. मात्र आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर मात्र चित्र बदललंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे संशयाची सुई वळलीय. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत स्पर्धा म्हणूनही याकडं पाहिलं जातंय. मुख्यमंत्री आणि पवार यांच्या भेटीत काय अंतिम फैसला होतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.