बापमाणूस! पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी पित्याची धडपड, जीवाची पर्वा न करता खोल विहिरीत मारली उडी आणि…

मनीष सोपानराव मानकर असे जिवाची बाजी लावणाऱ्या वडिलांचे नाव आहे. तर मनस्व असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शेगाव नाकानजीक अभिनव कॉलनीतील साईतिर्थ अपार्टमेंटमध्ये शनिवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मनस्व विहिरीत पडल्याची माहिती त्याचा मोठा भाऊ आर्यनने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फूट खोल विहीरीत उडी घेतली. आधी त्यांना मनस्व दिसून आला नाही.

    अमरावती : साडेचार वर्षाचा मुलगा मोठ्या भावासोबत खेळताना अचानक अपार्टमेंटमधील विहिरीत कोसळला. ही माहिती कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता त्याच्या पित्याने ७० फूट खोल विहिरीत उडी घेतली. या दोघांनाही महापालिकेच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढले.

    मनीष सोपानराव मानकर असे जिवाची बाजी लावणाऱ्या वडिलांचे नाव आहे. तर मनस्व असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शेगाव नाकानजीक अभिनव कॉलनीतील साईतिर्थ अपार्टमेंटमध्ये शनिवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मनस्व विहिरीत पडल्याची माहिती त्याचा मोठा भाऊ आर्यनने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फूट खोल विहीरीत उडी घेतली. आधी त्यांना मनस्व दिसून आला नाही.

    मात्र त्यांनी पाण्यात पुन्हा बुडी घेतल्यानंतर मनस्वचा पाय त्यांच्या हातात लागला. त्यांनी मनस्वला जवळ घेतले आणि कपारीचा आधार घेत पाण्यावर आले. तोपर्यंत विहिरीजवळ अपार्टमेंटमधील नागरिकांनी गर्दी केली होती. विहिरीत वडील व मुलगा जीवंत आहे किवा नाही, हे कुणालाही कळत नव्हते.

    दरम्यान, भ्रमध्वनीवरून नामक व्यक्तीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या रेस्क्यू टीमला माहिती दिली. त्यांनीही दोन किंमीचे अंतर पाच मिनिटात गाठले. विहिरीत दोरीची शिडी सोडून एका जवानाने त्यावरून उतरून मनस्वला काठावर आणले. त्यानंतर मनीष मानकर हे शिडीच्या आधाराने विहिरीबाहेर आले. मुलाला जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे उपचाराकरिता नेण्यात आले होते. दोघांना वाचविणाऱ्या रेस्क्यू टीममध्ये अनेक जणांचा समावेश होता.