‘Favipiravir’ is an easy alternative to the shortage of remedesivir worldwide; The task force also made a recommendation

जगभरात कोरोना विषाणूच्या कोविड-१९च्या म्यूटेशन (उत्परिवर्तन) मुळे त्यांच्यावर प्रभावीपणे इलाज करणा-या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांची कसोटी पणाला लागली आहे. त्यातच महाराष्ट्रासारख्या काही राज्यात कोरोनावर रेमडेसीवीरचा चुकीचा आणि अतिवापर तसेच नफेखोरी आणि काळाबाजार झाल्याने पर्यायी औषधांचा शोध सुरू झाला. त्यावर आता राज्याच्या टास्क फोर्सनेही ज्याला पर्याय म्हणून स्विकारण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे त्या फावीपिरावीर बद्दल खूपच कमी रूग्णांना माहिती आहे.

  मुंबई (किशोर आपटे) : जगभरात कोरोना विषाणूच्या कोविड-१९च्या म्यूटेशन (उत्परिवर्तन) मुळे त्यांच्यावर प्रभावीपणे इलाज करणा-या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांची कसोटी पणाला लागली आहे. त्यातच महाराष्ट्रासारख्या काही राज्यात कोरोनावर रेमडेसीवीरचा चुकीचा आणि अतिवापर तसेच नफेखोरी आणि काळाबाजार झाल्याने पर्यायी औषधांचा शोध सुरू झाला. त्यावर आता राज्याच्या टास्क फोर्सनेही ज्याला पर्याय म्हणून स्विकारण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे त्या फावीपिरावीर बद्दल खूपच कमी रूग्णांना माहिती आहे.

  कोरोना रुग्णांना तातडीचा उपचार

  भारतात नोवल कोरोना व्हायरस विरोधात ऍन्टी वायरल म्हणून आयसी एम आरने देखील या औषधांची शिफारस केली असून कोरोना सारख्या  एन्फ्लूएन्जा आजारात ते प्रभावी ठरले आहे. जपान मधील वैज्ञानिकांनी या औषधाची निर्मिती केली असून भारतात Drug Controller General of India (DCGI) ने देखील याला आणिबाणीच्या उपचारात वापरण्याची मुभा दिली आहे. या औषधाचा सर्वात प्रथम वापर चीन मधील वुहान येथे करण्यात आला. त्यानंतर युरोपातील साथरोगाचे देखील नियंत्रण करण्यात या औषधाचे योगदान मोठे आहे. त्या नंतर मध्यपूर्वेतील देश, आखाती देशांनीही याचा वापर प्रभावीपणे केला आहे. डिजीसीआय ने भारतात जून २०२० मध्येच याच्या वापराला मान्यता दिली आहे. जुलै २०२० मध्ये या औषधाच्या ३२ क्लिनीकल परिक्षणांचा अहवाल जाहीर झाला असून सौम्य आणि मध्यम बाधीत कोरोना रुग्णांना तातडीचा उपचार म्हणून हे इंजेक्शन दिले जाते.

  विषाणूरोधक म्हणून मान्यता

  जपानच्या टोतोमा केमिकल्स ने निर्माण केलेल्या या औषधाचा वापर ऍन्टी वायरल रसायन म्हणून केला जातो. जपानच्या २०१४ मध्ये आलेल्या साथरोगात त्याची निर्मिती आणि यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. आर एन ए प्रकारच्या विषाणु संसर्गाला शरीरात पसरण्यापासून हे औषध अटकाव करते असे याबाबतच्या संशोधनातून दिसून आले आहे. SARS-CoV-2. या  प्रकारच्या विषाणु संसर्गातही हे अलिकडे प्रभावी पणे काम करत असल्याचे दिसून आले आहे. एकूण ५३ प्रकारच्या विषाणू संसर्गात हे लागू पडत असून एचवनएनवन या एन्फ्लूएन्जा प्रकारातील संसर्गात त्याचा वापर करण्यात येतो. या शिवाय इबोला सारख्या साथीच्या रोगात त्याचा वापर २०१४मध्ये करण्यातआला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला विषाणूरोधक म्हणून मान्यता दिली आहे.

  जगभरात अनेक देशात क्लिनीकल चाचण्या

  कोरोना विषाणू संसर्गातही चीन मध्ये याचा वापर करण्यात आला, त्यावेळी क्लिनीकल चाचण्यांमध्ये ७ दिवस आणि १२ दिवस अश्या दोन गटांत या चाचण्या करण्यात आल्या. मात्र या दोन्ही गटातील रूग्णांना त्याचा विषाणू रोधक म्हणून प्रभाव असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. जपान मध्येही मे २० मध्ये या औषधाचा वापर कोविड-१९ रूग्णांसाठी करण्यास सुरूवात झाली. विषाणू बाधेच्या प्रभावा नुसार सात ते चौदा दिवसांच्या मात्रांचा उपयोग करण्यात आला त्यानंतर रूग्ण दगावण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांपेक्षा खाली आल्याचे निरिक्षण नोदविण्यात आले. सध्या रशीयातही याच्या चाचण्या सुरु असून मध्यम प्रकारची लागण झालेल्या ६० कोरोना रूग्णांवर याचा प्रयोग सकारात्मक दिसून आला आहे.

  माइल्ड मॉडरेट प्रकारच्या कोरोना रुग्णांना

  भारतातही याच्या क्लिनीकल चाचण्या नुकत्याच घेण्यात आल्या त्यांचा अहवाल उत्साहवर्धक असल्याचे सांगण्यात येत आहे. १६०० मिलीग्रँम मात्रा २ ते १४ दिवसांसाठी निरनिराळ्या रुग्णाना देण्यात आली. त्यात विषाणू रोधक क्षमता २८ टक्के पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. जपानच्या अलिकडच्या अभ्यासात या औषधाच्या साईड इफेक्ट बाबत २० टक्के रुग्णांमध्ये दिसून आला. त्यांना डायरिया सारखी लक्षणे दिसून आल्याचे सांगण्यात आले. मात्र अश्या प्रकारचा धोका अत्यंत कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. माइल्ड मॉडरेट प्रकारच्या कोरोना रुग्णांना याऔषधाचा वापर  ऐन्टी वायरल म्हणून देण्यास  डिजीसी आयने जून २० मध्ये मान्यता दिल्यानंतर रेमडेसीवीरला पर्याय म्हणून कोविड-१९च्या  आणिबाणीत ‘फावीपिरवीर’ अत्यंत उपयुक्त सामान्यांच्या आवाक्यातील सहज उपलब्ध असणारे औषध ठरले आहे.