प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

भारत नगर, चेंबूर दरडीचा कोसळून ८ घरे पडली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण केले असून सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून या ठिकाणच्या ३८ खोल्यांमधील १४० ते १४५ नागरिकांना एसजे केमिकल इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  मुंबई : वाशीनाका भारत नगर, चेंबूर येथील ८ घरांवर आणि विक्रोळी येथील सूर्यानगर मधील पंचशील चाळीतील ६ घरांवर दरडीचा भाग कोसळला. त्यात २८ जणांचा मृत्यू झाला. या भागात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी या भागातील१७५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

  भारत नगर, चेंबूर दरडीचा कोसळून ८ घरे पडली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण केले असून सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून या ठिकाणच्या ३८ खोल्यांमधील १४० ते १४५ नागरिकांना एसजे केमिकल इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  विक्रोळी येथील सुर्यानगर मधील पंचशील चाळीतील ६ घरांवर दरडीचा भाग कोसळला. या भागातही ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झाले असून ३० नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात येथील एमव्हीआर महापालिका शाळेत स्थलांतरित केले आहे.

  काळ सकाळी पावणे आठच्या सुमारास संघर्ष नगर इमारत क्रमांक १९ कुर्ला येथील दरडीचा दगड पडल्यामुळे दोघे किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली.

  काल दुपारी १२ वाजता कुर्ला कुरेशी नगर, कसाईवाडा या भागात दरडीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

  १५ शॉर्ट सर्किटच्या घटना

  शहरात ९, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा १५ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या मात्र त्यात जीवित हानी झालेली नाही.

  झाडे पडली

  शहरात ४, पूर्व उपनगर ७ आणि पश्चिम उपनगरात १७ अशा एकूण २१ तक्रारी आज दिवसभरात प्राप्त झाल्या.

  Fear of collapsing Migration of 175 citizens from Chembur and Vikhroli