Storm surge at Mumbai's Kovid Center for vaccinating Korana; Pushback, confusion

सकाळपासूनच केंद्रावर नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली आणि कधी नव्हे ते लसीकरण केंद्राच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही ठिकाणी नागरिकांसाठी करण्यात आलेली बैठकीची व्यवस्था तोकडी पडली. इतकेच नाही तर उर्वरित लोकांनी उन्हातान्हात लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या.

    मुंबई : बीकेसी लसीकरण केंद्रावररात कोराना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देत आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत लसींचा साठा कमी असून तीन दिवस पुरतील इतका साठा शिल्लक असल्याचे म्हटले होते. यामुळे मुंबईच्या सर्वात मोठ्या  गुरुवारी लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.

    सकाळपासूनच केंद्रावर नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली आणि कधी नव्हे ते लसीकरण केंद्राच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही ठिकाणी नागरिकांसाठी करण्यात आलेली बैठकीची व्यवस्था तोकडी पडली. इतकेच नाही तर उर्वरित लोकांनी उन्हातान्हात लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या.

    दरम्यान, प्रत्येक केंद्राला मागणीनुसार लसींचा पुरवठा करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. आज पुरेसा साठा आहे मात्र, उद्या लसींची कमतरता निर्माण झाली तर महानगरपालिका नागरिकांना माहिती उपलब्ध करून देईल अशी प्रतिक्रिया केंद्रवरील अधिकाऱ्यांनी दिली.