Riya Chakraborty's brother Shauvik Chakraborty gets bail

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक (shovik chakraborty) आणि सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) या दोघांना काल अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली. त्यांना आज न्यायालयात (court) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. अटकेच्या या कारवाईनंतर सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“एनसीबीने अटकेची कारवाई केली. त्यातून मुंबई पोलीस मोठं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, ही कुटुंबीयांना वाटणारी भीती बरोबर होती, हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात वेगवेगळे अँगल आहेत. वेगवेगळया अंगाने तपास होऊन, आणखी माहिती समोर येईल अशी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांना अपेक्षा आहे” असे विकास सिंह म्हणाले.

दरम्यान अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला घेऊन कोर्टात पोहोचले आहेत. कोर्टात आणण्याआधी शोविक, सॅम्युअल यांना सायन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.

शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.

शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमली पदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटकेला एनसीबीचे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्यात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.