राज्यात आजपासून आंदोलनाचे पर्व; आंदोलना ऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे अजित पवारांचे आवाहन

आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापत चालला असून मराठा, ओबीसी, धनगर हे सर्व समाज आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत आहे. त्याचवेळी ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. धनगर समाजानेही आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. अन्यथा, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी महापूजा होऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने बैठक घेऊन दिला. एकूणच पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आणि कोरोनाच्या सावटाखाली आरक्षणाच्या तीव्र भावना जनतेत असून, राज्यभर आंदोलनाची नवी मालिका सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारातील तीन मंत्री या आंदोलनात सहभागी होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी सरकारने फेटाळली.

  पुणे : आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच तापत चालला असून मराठा, ओबीसी, धनगर हे सर्व समाज आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत आहे. त्याचवेळी ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. धनगर समाजानेही आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. अन्यथा, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी महापूजा होऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने बैठक घेऊन दिला. एकूणच पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आणि कोरोनाच्या सावटाखाली आरक्षणाच्या तीव्र भावना जनतेत असून, राज्यभर आंदोलनाची नवी मालिका सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारातील तीन मंत्री या आंदोलनात सहभागी होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी सरकारने फेटाळली.

  अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ओबीसी संघटनांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झालं. ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल. तर, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या कोल्हापूर इथून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसेच हसन मुश्रीफ हे सहभागी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

  मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली पण अध्यादेश काढण्यात आला नाही. मागासवर्गीय आयोगातील सदस्य राजकीय पक्षाचे असल्याचे समजते. यात सरकारनं बदल करत नवे सदस्य नेमावेत. अन्यथा, हे मंत्रालय बरखास्त करावे, अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेडगे यांनी केली. येत्या 25 जून रोजी राज्यातील समस्त OBC समाजघटक सकाळी 11 वाजता प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर सरकार विरुद्ध निदर्शने करतील आणि तहसीलदारांना मागण्याचं निवेदन देतील, असेही शेंडगे यांनी घोषित केले.

  ओबीसीचा राजकीय आरक्षणासाठी लढा

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

  धनगर आरक्षण कायदा करा

  विधिमंडळ अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कायदा पास करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. राज्यातील तहसील कार्यालयावर 25 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. राज्य सरकारनं ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी शेंडगे यांनी केली. मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली पण अध्यादेश काढण्यात आला नाही.

  प्रकाश आंबेडकर सहभागी

  ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. संभाजीराजेंनी २९ मे रोजी पुण्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.

  महापूजा होऊ देणार नाही

  धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. अन्यथा, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी महापूजा होऊ देणार नाही, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी पंढरपूर येथे दिला.

  आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केले होते. संभाजीराजे यांनी आंदोलन करावे पण करोना वाढणार नाही याची काळजी घ्यावी. उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होईल.

  - अजित पवार, उपमुख्यमंत्री

   

  हे सुद्धा वाचा