Fierce fire on Kurla CST Road; Citizens are frightened by the huge plume of smoke

कुर्ला पश्चिम इथे बस डेपो जवळील कुर्ला सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सची दुकाने आहेत. येथील एका दुकानात आग लागली. दुपार चारच्या सुमारास ही घटना घडली. अग्नीतांडव झाल्याने यंत्रणांची धावपळ उडाली.

    मुंबई : मुंबई पुन्हा एकदा अग्नीतांडव पाहायला मिळाले. कुर्ला सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीमुळे उठलेले धुराचे मोठमोठे लोळ पाहून नागरिक भयभीत झाले.

    कुर्ला पश्चिम इथे बस डेपो जवळील कुर्ला सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सची दुकाने आहेत. येथील एका दुकानात आग लागली. दुपार चारच्या सुमारास ही घटना घडली. अग्नीतांडव झाल्याने यंत्रणांची धावपळ उडाली.

    जवळपास तीन किलोमीटर अंतरावरुनही धुराचे लोळ दिसत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे.