Narayan Rane says about the ED inquiry of Sanjay Raut's wife

मुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे( Narayan Rane ) यांना झालेल्या अटकेनंतर राणे आणि भाजपा शिवसेनेवर सातत्याने टीका करीत आहे तर या सर्व टीकेला खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे प्रत्युत्तरही देत आहेत. आता हा वाद शिगेला पोहोचल्यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची चर्चा आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे( Narayan Rane ) यांना झालेल्या अटकेनंतर राणे आणि भाजपा शिवसेनेवर सातत्याने टीका करीत आहे तर या सर्व टीकेला खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे प्रत्युत्तरही देत आहेत. आता हा वाद शिगेला पोहोचल्यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची चर्चा आहे.

    राऊत यांचे घर आणि कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले असून डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनीही राऊत यांची भेट घेतली असल्याचे समजते. भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राऊत यांची सुरक्षा वाढविण्यात आल्याची चर्चा आहे.

    संजय राऊत यांना पक्षांतर्गत धोका वाढला असेल. कारण पुढेपुढे तेच दिसत आहेत आणि त्यामुळे शिवसेना पक्षाचे नेतृत्वही समर्थपणे करताना ते दिसत आहेत. ते माझे मित्र असल्याने मला भीती आहे. सुरक्षा वाढवताना सरकारी यंत्रणांनी धोका कोणापासून आहे हे पाहावे. आमचे म्हणणे आहे की धोका हा अंतर्गत शत्रूंपासून आहे.

    आशीष शेलार, आमदार, भाजपा