सामनाच्या अग्रलेखावरून भाजप आक्रमक, संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ ऑक्टोबर २०२० च्या दसऱ्या मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे आता भाजपने देखील मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यानंतर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात सुद्धा भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ ऑक्टोबर २०२० च्या दसऱ्या मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे आता भाजपने देखील मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यानंतर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात सुद्धा भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य घडल्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखावरून भाजप अधिक प्रमाणात आक्रमक झाली आहे. सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणेंवर अनेक आक्षेपार्ह शब्द वापरत टीका करण्यात आली होती. याविरोधातही भाजपने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.