शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा – सदावर्ते

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध बेकायदेशीररित्या गर्दी जमवणे, कोरोनाला आमंत्रित करणे आणि कोरोना संक्रमणाचे नियम न पाळणे इत्यादीमुळं भारतीय संविधानातील कलम २१ नुसार इतरांच्या जीवन जगण्याबाबत संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली आहे

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. तसेच कुठंही सामाजिक अतंराचे भान राखले गेले नाही. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. यांच्यासमोर पार पडणाऱ्या कार्यक्रमात सर्व कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

    याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध बेकायदेशीररित्या गर्दी जमवणे, कोरोनाला आमंत्रित करणे आणि कोरोना संक्रमणाचे नियम न पाळणे इत्यादीमुळं भारतीय संविधानातील कलम २१ नुसार इतरांच्या जीवन जगण्याबाबत संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    कलम १८८ २६९  इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत गुन्हा नोंद घेण्यात आला आहे. परंतु शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना आरोपी केलं नाही लोकांनी डोळ्यांनी बघितलं आरोपी करणाऱ्या लोकांमध्ये पाच लोक आहेत. तरी सुद्धा पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच यामध्ये  ठोंबरे, संजय काळे, संचेती आणि इतर आरोपी आहेत. परंतु पोलिसांनी शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळं माझी पोलिसांकडे मागणी आहे की, शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.