फसवणूक केल्याप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : डॉ किरिट सोमैय्या

दापोली मुरूड येथे परब यांनी शेतजमीन खरेदी केली त्यावर मागील वर्षी टाळेबंदीच्या काळात बेकायदा रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. सोमैय्या म्हणाले की, या जागेवर अकृषक दाखला नसताना परब यांनी तसे बनावट कागदपत्राव्दारे ग्रामपंचायतीला पत्र दिले मात्र अद्यापही सरकारी दाखल्यावर ही शेतजमीन असल्याचे नोंद असताना परब यांनी खोठ्या कागदपत्राव्दारे बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून टाळेबंदीच्या काळात बांधकाम पूर्ण केले.

    मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ किरिट सोमैय्या यांनी परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून  हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

    बनावट कागदपत्राव्दारे बांधकाम
    सोमैय्या म्हणाले की दापोली मुरूड येथे परब यांनी शेतजमीन खरेदी केली त्यावर मागील वर्षी टाळेबंदीच्या काळात बेकायदा रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले आहे. सोमैय्या म्हणाले की, या जागेवर अकृषक दाखला नसताना परब यांनी तसे बनावट कागदपत्राव्दारे ग्रामपंचायतीला पत्र दिले मात्र अद्यापही सरकारी दाखल्यावर ही शेतजमीन असल्याचे नोंद असताना परब यांनी खोठ्या कागदपत्राव्दारे बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून टाळेबंदीच्या काळात बांधकाम पूर्ण केले.

    हकालपट्टीची मागणी करणार
    ते म्हणाले की, त्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर आरोप झाले त्यानंतर त्यांनी त्यांचे केंबल व्यवसायातील भागीदार सदानंद कदम यांना १ कोटी १० लाख रूपयांत विकली त्यावेळी देखील ही जमीन शेतजमीन असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बेकायदा काम केलेल्या इमारती पाडून टाकाव्या यासाठी आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असून त्यांनतर राज्यपांलांकडे त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करणार आहे.