File homicide charges against ONGC; Ignored the hurricane warning

तोक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि 700 कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यामुळे 37 कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

    मुंबई : तोक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि 700 कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यामुळे 37 कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

    चक्रीवादळाचा धोका असल्याचे सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. 700 कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यातील एक बार्ज बुडुन 37 कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही 40 कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगार अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व घटनेला ओएनजीसी जबाबदार असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

    चक्रीवादळात ओएनजीसीची जहाजे अडकून पडण्यामागील घटनांची चौकशी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत जहाजबांधणी महासंचालक अमिताभ कुमार, हायड्रोकार्बन महासंचालक एस.सी.एल.दास आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव नाझली जाफरी शायीन यांचा समावेश आहे. संबंधित घटनांची चौकशी ही समिती करणार आहे. गरज भासल्यास या समितीत आणखीही काही मंडळींचा समावेश करून त्यांचे सहकार्य घेतले जाऊ शकते. एका महिन्यात या समितीला अहवाल सादर करावयाचा आहे.