खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईल; भाजप नेत्याचा हल्लाबोल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. आता देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल आगहे. यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. ५ एप्रिल रोजी उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. आता देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल आगहे. यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

    भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्यावर निशाणा साधला आहे. “खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? असा प्रश्न उपस्थित करत, खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…”अशी टीकाही त्यांनी केली आहे. खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…”असा हल्लाबोल त्यांनी केला.

    सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे असेही ते म्हणाले.