Mumbai Mayor kishori pendnaekar

आयुक्तांनी कामचुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच दर आठवड्याला रस्त्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा खड्डा भरला जाईल, तेव्हा त्यावरून कोणतेही वाहन जाणार नाही. यासाठी बॅरिकेट लावून संरक्षित केले पाहिजे, यासंदर्भात सांगण्यात आले. नुसता भरला आणि झालं नाही. जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेत रस्तेदुरुस्तीचे काम केले जाईल. अशावेळी नागरिकांनी काम थांबवू नका. खड्डे भरताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असं सुद्धा महापौर पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

    मुंबई : खड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत कलगीतुरा रंगल्याचे आपण पाहिले आहे. तसेच सध्या खड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक होत आहे. त्यामुळं मुंबईतील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुंबईतील रस्त्यांसदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईच्या आयुक्तांनी कामचुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुढील १५ दिवसांत खड्डेमुक्त मुंबईचे प्रत्यय दिसणार असून, २२७ नगरसेवक आपल्या वॉर्डमधील खड्डे भरले आहेत की नाहीत याचा आढावा घेतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितली.

    दरम्यान आयुक्तांनी कामचुकार कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच दर आठवड्याला रस्त्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा खड्डा भरला जाईल, तेव्हा त्यावरून कोणतेही वाहन जाणार नाही. यासाठी बॅरिकेट लावून संरक्षित केले पाहिजे, यासंदर्भात सांगण्यात आले. नुसता भरला आणि झालं नाही. जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेत रस्तेदुरुस्तीचे काम केले जाईल. अशावेळी नागरिकांनी काम थांबवू नका. खड्डे भरताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असं सुद्धा महापौर पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

    खड्डावरुन राजकारण करु नका असं विरोधकांना महापौरांनी टोला लगावला. खड्डा किती मोठा-छोटा असा भेदभाव न करता सरसकट ४२ हजाराच्यावर एप्रिल ते आजपर्यंत खड्डे भरले आहेत. अर्थात जे खड्डे भरले ते तसेच राहिले का? की पुन्हा नवीन निर्माण झाले? हिच पाहणी आपण दोन दिवसांपूर्वी केली. आयुक्तांना विनंती आणि निर्देश दिले की, ज्याला आपण रोडचा अधिकारी म्हणतो, त्या अधिकाऱ्याला कोणतेही वेगळे काम न देता, वॉर्ड ऑफिसमध्ये फिरणे, खड्डे बघणे, ते भरणं, त्यासाठी लागणाऱ्या उत्पादनाची मागणी करणे. फक्त रोडची नाही, तर येणाऱ्या साथीच्या आजाराबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.