अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चालू आहेत. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून  सुनावणी झाल्यानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई :  केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ( Union Ministry of Railways) अंतिम वर्षाची परीक्षा (Final Year Exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चालू आहेत. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून  सुनावणी झाल्यानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु केली जाणार आहेत, अशी माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा  राज्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाने या अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षांचं स्वरुपही जाहीर केलं आहे. या परीक्षा एमसीक्यू (MCQ) म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नाच्या स्वरुपात घेण्यात येणार आहेत.