अखेर अनिल परबांचेही अनिल देशमुखांच्या पावलांवर पाऊल; प्रत्यक्ष हजर न राहता वकीलांमार्फत ईडीला पाठविला जबाब

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सक्तवसुली संचलनालय ईडीने पाठविलेल्या नोटीस प्रमाणे जबाबासाठी हजर राहणे टाळले आहे. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपल्या वकीलांमार्फत ईडीला आपला जबाब कळविला आहे. चौकशीसाठी का हजर राहणार नाही याचे कारण देताना परब यांच्या वते सांगण्यात आले आहे की, मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता चौदा दिवसांची मुदतही परब यांच्या वकीलांनी ईडीकडे मागितली आहे.

    मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सक्तवसुली संचलनालय ईडीने पाठविलेल्या नोटीस प्रमाणे जबाबासाठी हजर राहणे टाळले आहे. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपल्या वकीलांमार्फत ईडीला आपला जबाब कळविला आहे.

    चौकशीसाठी का हजर राहणार नाही याचे कारण देताना परब यांच्या वते सांगण्यात आले आहे की, मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता चौदा दिवसांची मुदतही परब यांच्या वकीलांनी ईडीकडे मागितली आहे.

    चौदा दिवसांची वेळ देण्यात यावी

    अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावल्यांनतर परब ईडी कार्यालयाकडे फिरकले नाहीत. परब यांच्या वकीलांमार्फत ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याने चौदा दिवसांची वेळ देण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे. दरम्यान आता परब यांना वेळ द्यायचा की त्यांना दुसरे समन्स काढायचे यावर ईडीचे अधिकारी विचार करतील.