Eknath Khadse joined the NCP.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थिती हा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला.

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थिती हा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनाही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या वक्तव्यातुन भाजपावत जोरदार फटकेबाजी केली. तसेच कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येने आले आहेत त्यामुळे सोशल डिस्टेंन्सिंगचं पालन कुठेतरी कमी पडलं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. असेही ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसेंवर वारंवार अन्याय केला गेला. त्यांच्यावर अन्याया झाल्यावर मीच जास्त बोलो असेल. महाराष्ट्रच्या राजकारणात सुडाचे राजकारण मी कधीही पाहिले नसेल असे जंयत पाटील म्हणाले.

राज्यात सुसंस्कृत राजकारण करायचं हे यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं, पण मागच्या कालखंडात कुठेतरी राज्यातलं राजकारण बदललं, लोकसभा निवडणुकीत मोठा फटका राष्ट्रवादीला बसला, विधानसभा निवडणुकीवेळी भलेभले नेते, ज्यांच्यावर शरद पवारांनी विश्वास ठेवला ती माणसं आम्हाला सोडून दिली. मात्र राज्याच्या राजकारणात शरद पवारांचे विचारच जनता स्वीकारेल हा ठाम विश्वास आम्हाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अनेक घटना सगळ्यांसमोर आहे. वयाच्या ७९ व्या वर्षीही शरद पवार राज्यभर फिरले, तरुण कार्यकर्ते खवळून उठला होता. शरद पवारांना सुडबुद्धीने ईडीची नोटीस पाठवली, त्यातून आताच्या सरकारचा पाया रचला गेला असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसेंच्या भाषणातील काही मुख्य मुद्दे –

एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीत मुलगी रोहिणी खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मला प्रवेश दिल्याबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मी आभारी आहे
राजकारणात ४० वर्ष काढले, पण महिलेला समोर ठेऊन कधी राजकारण केले नाही
मानहानी, बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला
मी काय गुन्हा केला, असा प्रश्न सातत्याने विचारला पण त्याचे उत्तर मिळाले नाही
राजकारणात येण्यासाठी, मंत्रिमंडळात येण्यासाठी संघर्ष करावा लागला, संघर्ष करणे हा स्थायी स्वभाव
माझ्यामागे ईडी लावली तर मग सीडी लावीन आणि भाजपाने मला अडगळीत टाकले होते
नाथाभआऊंनी उभी हयात तुमची सेवा केली, त्याचं काय
उभं आयुष्य पक्षासाठी दिलं, पक्षाने माझ्या साठी काय विशेष केले
ज्या निष्ठेने भाजपाचे काम केले त्याच निष्ठेने राष्ट्रवादीचे काम केले आणि भाजपाच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादीचा विस्तार करणार
१०० टक्के पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे येतील
कार्यकर्त्यांची भावना होती की राष्ट्रवादीत गेले पाहिजे
सहा महिने चर्चेनंतर राष्ट्रवादीची निवड केली.
दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता.
नाथाभाऊंची ताकद दाखवण्यासाठी जळगावात मोठा कार्यक्रम घेणार
डोक्यावरचं ओझं गेल्यासारखं झालं आहे- खडसे
राज्यातून आणि दिल्लीतून अनेक भाजपाच्या नेत्यांचे फोन आले, दिलंत पण छळले त्याचे काय,
माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला – खडसे
दोन वेळा अँटी करप्शन ब्युरोची चौकशी लावली, मी कोणता भूखंड घेतला.
कोणी कोणते भूखंड घेतले, हे काही दिवसांनी सांगेन- खडसे
शपथ घेतली तेव्हा तुमची नितीमत्ता कुठे गेली होती, शरद पवारांसमोर खडसेंचा फडणवीसांना सवाल
तुम्हाला वर्षभराच्या आत नक्की बदल दिसेल