… अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त गृहमंत्री देशमुखांनी ट्विट करून दिली माहिती

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटकरून दिली आहे.

    मुंबई: पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटकरून दिली आहे. याशिवाय रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार तर संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निलंबित एपीआय सचिन वाझे अटकेनंतर पोलीस प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे.