… अखेर प्रकाश आंबेडकरांच्या सुट्टीचे नेमके कारण आले समोर ; प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन दिले ‘ही’ माहिती

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे.

    मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेमकी कशासाठी सुट्टी घेतली, काय कारण असू शकेल ? यासारख्या अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नेमलेल्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबडेकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे.

    ‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येईल, असे मेडिकील बुलेटीनमध्ये म्हटले आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट वंचित बहुज आघाडीच्या सोशल मीडियातून देण्यात येईल’, असेही वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी व्हिडिओतून सांगितले आहे.

    प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ३ महिने दूर राहत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. दरम्यान, आंबेडकर यांची प्रकृतीस्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार, आज मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात आले आहे. आंबेडकर यांनी व्हिडिओद्वारे आपल्या सुट्टीची घोषणा केली होती. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहेत. ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहे.