aknaTh Khadse resign letter

कनाथ खडसे हे मागील काही महिन्यांपासून भाजपावर नाराज होते. त्यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांबाबत आपली नाराजी जाहीर व्यक्त केली होती. परंतु एकनाथ खडसेंनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना अवघ्या २ ओळींचा राजीनामा लिहिला आहेत. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपाचे बडे नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या प्रत्येक बातमीत प्रश्नचिन्ह येत होता. तो प्रश्नचिन्ह आता गायब झाला आहे. प्रश्नचिन्हासोबत बातम्यांच्या हेडींगसह बातमीत देखील संदिग्धता व्यक्त केली जात होती.

मात्र बातम्यांमधील तो प्रश्नचिन्ह (?) त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या ताज्या वृत्तानुसार नाहीसा झाला आहे एकनाथराव खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाणार प्रवेश करणार असल्यचे रा.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जाहीर केले आहे.

भाजप नेते एकनाथ खडसेंचा २ ओळींचा राजीनामा

एकनाथ खडसे हे मागील काही महिन्यांपासून भाजपावर नाराज होते. त्यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांबाबत आपली नाराजी जाहीर व्यक्त केली होती. परंतु एकनाथ खडसेंनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना अवघ्या २ ओळींचा राजीनामा लिहिला आहेत. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मी एकनाथ गणपत खडसे, माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

एकनाथराव खडसे यांनी फोन करुन भाजपचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आम्ही स्वागत करत आहोत असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 aknath Khadse