जाणून घ्या ! कोण आहेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  मुंबई:  पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले हेमंत नगराळे यांच्याविषयी थोडक्यात माहिती

  – मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेले हेमंत नगराळे हे सन १९८७ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

  – हेमंत नगराळे यांनी२०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदावर काम केले आहे.

  – पुढे दोन वर्षांनी, सन २०१८ मध्ये त्यांची नागपूरला बदली करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होत असा नागराळे पोलीस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून काम करत होते.

  – हेमंत नगराळे यांचा १ वर्षे ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

  – नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना हेमंत नगराळे चर्चेच आले होते. त्यावेळी वाशी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेवरील दरोड्याची उकल नगराळे यांनी अवघ्या दोन दिवसात केली होती. हे प्रकरण देशभर गाजले होते.