payal ghosh and anurag kashyap

  • वर्सोवा पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई : चित्रपट निर्माता (Director) अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात (versova police station) लैंगिक अत्याचाराचा (Sexual harassment) गुन्हा मंगळवारी रात्री दाखल करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

पीडितेने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात मंगळवारी जाऊन कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली. तसेच त्याच्याविरोधात बलात्कार तसेच अन्य गंभीर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रात्री उशीरा कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले.

‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची भेट कश्यपसोबत झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच दरम्यान म्हणजे २०१४-१५ मध्ये हा प्रकार घडल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत वाच्यता करू नको असा सल्ला तिला त्यांच्याकडून देण्यात आला. तसेच टिष्ट्वटरवरील पोस्ट घरच्यांनी तिला डिलीट करायला लावली असे तिचे म्हणणे आहे.