अखेर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल; इतर सहा कर्मचाऱ्यांविरोधातही एफआयआर

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर २०१५ ते २०१८ दरम्यान बदली झाल्यानंतरदेखील सरकारी निवासस्थानाचा वापर केल्यामुळे २४ लाख रुपयांचा दंड लावला गेला आहे.  परमबीर सिंह जेव्हा ठाण्याचे पोलिस आयुक्त होते तेव्हा ते २ सरकारी निवासस्थानांचा वापर करत होते. २०१८ पर्यत परमबीर सिंह यांच्यावर ५४ लाख १० हजार ५४५ रुपयांचा दंड लावण्यात आला होता.

    मुंबई, गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (FIR registered against Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणी उकळण्याच्या प्रकरणात केस नोंदवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याबरोबर इतर ६ पोलिस कर्मचाऱ्यांवरदेखील एफआयआर दाखल  करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर दोघांविरोधातही खंडणी उकळण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अकबर पठाण यांचेही नाव आहे. पोलिसांनी दोन नागरिकांना या प्रकरणात अटक केली आहे. सुनील जैन आणि पुनमिया अशी त्याची नावे आहेत. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

    परमबीर सिंहांना सरकारी निवासस्थान वापरल्यासाठी २४ लाखांचा दंड

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर २०१५ ते २०१८ दरम्यान बदली झाल्यानंतरदेखील सरकारी निवासस्थानाचा वापर केल्यामुळे २४ लाख रुपयांचा दंड लावला गेला आहे.  परमबीर सिंह जेव्हा ठाण्याचे पोलिस आयुक्त होते तेव्हा ते २ सरकारी निवासस्थानांचा वापर करत होते. २०१८ पर्यत परमबीर सिंह यांच्यावर ५४ लाख १० हजार ५४५ रुपयांचा दंड लावण्यात आला होता. त्यातील त्यांनी २९ लाख ४३ हजार रुपयांचा दंड जमा केला होता. मात्र अद्याप २४ लाख ६६ हजार रुपयांचा दंड देणे बाकी आहे. परमबीर सिंह तेव्हा मलबार हिल येथील नीलिमा अपार्टमेंटमध्ये राहत होते. सूंत्राकडून समोर आलेल्या माहितीनुसार परमबीर सिंहाकडे बाकी असलेली २४ लाख रुपयांची दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या पैशांमधून वसूल केली जाऊ शकते. परमबीर सिंह सध्या होमगार्डचे डीजी आहेत.