mumbai NCb fire

एनसीबीचे कार्यालय बॅलार्ड पियर येथे असलेल्या एक्सचेंज इमारतीत आहे. येथेच आग लागली. आगीवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. थोड्या वेळाने ही आग विझविण्यात आली.

मुंबई : मुंबईतील (Mumbai)  एनसीबी (NCB) ऑफिस इमारतीत भीषण आग (Fire) लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या  (fire brigade vehicles ) घटनास्थळी दाखल झाल्या आसून आग विझवण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी केली जात आहे तिथेच एनसीबीच्या कार्यालयाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

एनसीबीचे कार्यालय बॅलार्ड पियर येथे असलेल्या एक्सचेंज इमारतीत आहे. येथेच आग लागली. आगीवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. थोड्या वेळाने ही आग विझविण्यात आली. आगीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळाल्याची भीती व्यक्त केली जात होती, परंतु अधिकाऱ्यांनी ते नाकारले. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल, रिया चक्रवर्ती आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे या कार्यालयात ठेवली आहेत.


तिसर्‍या मजल्यावर आहे एनसीबीचे कार्यालय

इमारतीच्या दुसर्‍या मजल्याला किरकोळ आग लागली. या इमारतीत एनसीबी कार्यालय आहे परंतु ते तिसर्‍या मजल्यावर आहेत. एनसीबी कार्यालय पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे, कोणतीही जखमी झालेली नाही.