fire at powai

मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांचे(fire in mumbai) सत्र थांबतानाचे चित्र दिसून येत नाही. आज आणखी एका ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आली. पवई(powai) येथील त्रिकुटा टॉवरला आज आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्वरित आग विझवल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

पवई येथील आदी शंकराचार्य मार्गावर असलेल्या त्रिकुटा टॉवर या इमारतीला आज सकाळी १०.४५ च्या सुमारास आग लागली. तळ मजला अधिक १६ अशा१७ मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाची ५ वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग छोटी असल्याने ११.१९ वाजता ही आग अग्निशमन दलाने त्वरित विझवली. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी आग शॉकसर्किटमुळे लागल्याची माहिती मिळत आहे.

नुकतीच मुंबई सेंट्रल येथे सिटी सेंटर मॉलला आग लागली होती. ही आग विझवायला मुंबई अग्निशमन दलाने तब्बल ५६ तासांनी विझवली होती. यामुळे मुंबईत कुठेही आग लागली की नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत आहे.