मुंबईत हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्लँट; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मुंबईत ऑक्सिजन प्लँटची निर्मिती केली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पवईतील हिरानंदानी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला प्लँट बसवण्यात आला आहे. पर्यटनमंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्लँटचे सोमवारी लोकापर्ण करण्यात आले.

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मुंबईत ऑक्सिजन प्लँटची निर्मिती केली जाते आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पवईतील हिरानंदानी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला प्लँट बसवण्यात आला आहे. पर्यटनमंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्लँटचे सोमवारी लोकापर्ण करण्यात आले.

    मुंबईत कोरोनाच्या दुस-या लाटेत वाढलेल्या रुग्णांमुळे ऑक्सिजनची कमतरता भासल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल झाले. ऑक्सिजन अभावी काही रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्याची वेळ आली होती. वाढलेले रुग्ण व त्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आरोग्य विभागासमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी ऑक्सिजन प्लॅंट निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    पवई येथील हिरानंदानी रुग्णालयाने हवेतून ऑक्सिजन तयार करणारा पहिला प्लँट बसवला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या ऑक्सिजन प्लँटचे उद्धाटन करण्यात आले. या ऑक्सिजन प्लँटमध्ये आजूबाजूला असणारी हवा आत खेचून घेतली जाते. मग टप्प्याटप्पाने प्रक्रिया करून ऑक्सिजन वेगळे केले जाते. त्यानंतर ऑक्सिजन रुग्णालयात पोहोचवला जातो.

    या प्लँटची दैनंदिन क्षमता १० लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीची आहे. प्लॅटचा संपूर्ण खर्च ७० ते ८० लाख इतका आहे. लिक्विड प्लॅंटपेक्षा वेगाने ऑक्सिजन निर्मिती या प्लॅंटमध्ये होते. हवेतील ऑक्सिजन हा कॉम्फ्रेश मशीन मध्ये खेचून घेतला जातो. त्यानंतर ही हवा फिल्टर करून त्याला तेलजन्य पदार्थ वेगळे केले जातात. यातून हवेतून ऑक्सिजन वेगळा करून प्रेशर केल्यानंतर रुग्णालयात रुग्णांसाठी पाठवला जातो.