मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे प्रथम वर्ष पदवी प्रवेश रद्द, नव्याने प्रक्रिया

सरकारी नोकऱ्या (Government jobs) आणि शिक्षणांमधील (Education) मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha reservation ) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द (First year degree admission cancelled) करून सर्व प्रक्रिया नव्याने (New Procedure) राबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून (State  Government) विद्यापीठांना देण्यात आले आहेत.

मुंबई: सरकारी नोकऱ्या (Government jobs) आणि शिक्षणांमधील (Education) मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha reservation ) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द (First year degree admission cancelled) करून सर्व प्रक्रिया नव्याने (New Procedure) राबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून (State  Government) विद्यापीठांना देण्यात आले आहेत. सध्या मराठा आरक्षणाचे प्रकरण अधिक न्यायधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगतिले आहे.

मराठा आरक्षणास तूर्त स्थगिती देताना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या झालेल्या प्रवेशांमध्ये बदल करू नये, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये बदल होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया न झालेल्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा आरक्षण लागू होणार नसल्याचं सांगतिले जात आहे.

राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवीची प्रवेश प्रक्रिया झाली आहे, तर अकरावी, पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असून आरक्षण लागू होणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. परंतु गुरुवारी जाहीर होणारी अकरावीची दुसरी प्रवेश यादी स्थगित करण्यात आली होती. मात्र प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश रद्द करण्याच्या सूचनांनंतर अकरावी प्रवेशाचे पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.