विकास कामांच्या नावाखाली वरळीतील आणखी पाच शौचालये तोडणार, रहिवाशांमध्ये नाराजी

सध्या वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावर दोन, प्रेमनगर आणि शंकरराव नरम पथ, जिजामातानगर येथील प्रत्येक एक सार्वजनिक शौचालये तोडली जाणार आहेत. एकाचवेळी पाच सार्वजनिक शौचालये तोडली जाणार असल्याने स्थानिकांकडून विरोध दर्शविला जात आहे. 'सुरक्षित मुंबई असोसिएशन'चे अध्यक्ष दिनेश वाघेला यांनी सार्वजनिक शौचालये तोडताना सुविधांचा विचार करायला हवा, असे म्हटले आहे.

  मुंबई – विकास कामांच्या नावाखाली वरळीतील जी- दक्षिण विभागात पालिकेकडून याआधी तोडण्यात आलेल्या शौचालयांपाठोपाठ आणखी पाच सार्वजनिक शौचालये तोडण्याची कारवाई सुरू झाली आहे. आधीच सार्वजनिक शौचालयांची कमतरता त्यात ही शौचालये तोडली जात असल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरण्याचीही रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

  मुंबईत सार्वजनिक ठिकाणी शौचालयांच्या कमतरतेमुळे अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण होते. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत स्वच्छतेला आणखीनच महत्त्व लाभले आहे. अशावेळी पालिकेकडून वरळीतील पाच सार्वजनिक शौचालये तोडली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

  सध्या वरळीतील पांडुरंग बुधकर मार्गावर दोन, प्रेमनगर आणि शंकरराव नरम पथ, जिजामातानगर येथील प्रत्येक एक सार्वजनिक शौचालये तोडली जाणार आहेत. एकाचवेळी पाच सार्वजनिक शौचालये तोडली जाणार असल्याने स्थानिकांकडून विरोध दर्शविला जात आहे. ‘सुरक्षित मुंबई असोसिएशन’चे अध्यक्ष दिनेश वाघेला यांनी सार्वजनिक शौचालये तोडताना सुविधांचा विचार करायला हवा, असे म्हटले आहे.

  गैरसुविधा उद्भवू नये याचे भान राखत पालिकेने सुविधा पुरविल्यानंतरच सार्वजनिक शौचालये तोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
  सध्याच्या स्थितीत सार्वजनिक शौचालयांच्य़ा संख्येत वाढ करून सर्व सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे.

  असे असताना शौचालयांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी त्यात घट होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान सार्वजनिक शौचालये पाडल्यानंतर पादचारी, टॅक्सीचालकांसह इतर वाहनचालकांची गैरसोय होईल, असेही येथील रहिवाशांनी म्हटले आहे.