रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे पाच पोलीस निलंबित

जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

    जालना. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे झडती (g Raosaheb Danve’s public relations office) घेतल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर गृह विभागाने कारवाई करत दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाचे झडती घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

    पोलीस उपनिरिक्षकासह पाच पोलीस निलंबित
    याबाबतची कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केली आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणासाठी दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली होती याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके यांचा समावेश आहे.