मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहणा केले. मंत्रालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यातील कोरोना योद्ध्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. सर्व कोरोना योद्धे यावेळी उपस्थिती होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई : देशात ७४ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर सकाळी ध्वजारोहण करुण देशाला संबोधित केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मंत्रालयात ध्वजावंदन केले. तसेच मुंबईतील वर्षा बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजावंदन केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहणा केले. मंत्रालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यातील कोरोना योद्ध्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. सर्व कोरोना योद्धे यावेळी उपस्थिती होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मंत्रालयात ध्वाजारोहण झाल्यानंतर मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना योद्धे डॉक्टर्स, नर्स तसेच वैद्यकीय सहायक यांच्याशी संवाद साधला. कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटले. तसेच त्यांचे कौतुकही केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये डॉक्टर्स, नर्स. आरोग्य कर्मचारी, आणि पोलीस यंत्रणा तसेच राज्यातील स्वच्छता दूत हे खरे कोरोना योद्धे आहेत. त्यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केल्यांनंतर जय जवान, जय किसानचा नारा देत, शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याची घोषणा केली. तसेच राज्यातील सर्व दुर्गम भागात चांगल्या सुविधा पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, देशात ऑनलाईन शिक्षण सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. 

 भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई उच्च न्यायालय येथे ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय येथे देखील ध्वजावंदन केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई उच्च न्यायालय येथे ध्वजारोहण केले. pic.twitter.com/eB3NQxdbxx

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2020