राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; ५,०३१ नवीन रुग्ण तर २१६ कराेना बाधित रुग्णांचा मृत्यु

राज्यात आज २१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२८,४०,८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३७,६८० (१२.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,२६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबई : राज्यात बुधवारी ५,०३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,३७,६८० झाली आहे. आज ४,३८० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४७,४१४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५०,१८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज २१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२८,४०,८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३७,६८० (१२.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,२६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ३४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४२००३ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९५६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]