काेराेना रुग्णसंख्येत चढ-उतार; राज्यात ३,७८३ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात बुधवारी ३,७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,०७,९३० झाली आहे. काल ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१७,०७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ % एवढे झाले आहे.

    मुंबई : राज्यात बुधवारी ३,७८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,०७,९३० झाली आहे. काल ४,३६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,१७,०७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ % एवढे झाले आहे.

    दरम्यान, राज्यात काल ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६३,६१,०८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,०७,९३० (११.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २,८७,३५६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५१५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३६२८२ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६०३७ मृत्यूची नोंद करण्यात आली.