नोटा हाताळणाऱ्यानी, खाद्यपदार्थ तयार करणा-यांनी वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घ्यावी: अन्न व औषध प्रशासनाच्या  सुचना

मुंबई : कोरोनाच्या या संकटकाळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात किरणामाल, खाद्यपदार्थांची दुकाने, बँका यांचा समावेश केला आहे.

 मुंबई : कोरोनाच्या या संकटकाळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात किरणामाल, खाद्यपदार्थांची दुकाने, बँका यांचा समावेश केला आहे.  व्यावसायिक व दुकानदार आणि बँकांमधील कर्मचा-यांनी कोणती काळजी घ्यावी याची मार्गदर्शक तत्वे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे. बँक कर्मचा-यांनी व दुकानदारांनी नोटा हाताळल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ हाताळण्यापूर्वी व अन्न पदार्थ हाताळल्यानंतर हँड सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सुचना जारी केल्या आहेत.

 
खाद्यपदार्थांची विक्री व उत्पादन करणा-यांसाठीअन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांची यादी
 
-दुकानांच्या बाहेर रांगेत उभे राहाणा-या ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखावे
 
-अन्नपदार्थ हाताळल्यानंतर त्या हातांनी चेह-याला स्पर्श करू नका
 
-दुकाने-आस्थापनांमध्ये स्वच्छता राखा
 
-मास्कचा वापर आवश्यक
 
-ग्राहकांसाठी हँडसॅनिटायझरची व्यवस्था करा
 
-अन्नपदार्थ हाताळणा-या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करावी. वैयक्तीक स्वच्छता राखा
 
-लाँकडाऊनच्या काळात अन्न व्यावसायिकांनी तांगल्या दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करावी.
 
-मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करू नका
 
-नाशवंत अन्नपदार्थ फ्रीजमध्ये योग्य तापमानात साठवावे. त्याचे सेवन चोवीस तासांच्या आत करण्याबाबत ग्राहकांना सुचना द्याव्यात
 
-या कालावधीत फक्त परवानाधारक- नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी. पक्की बीले घेऊन त्याची बीले जतन करून ठेवा
 
-या सुचनांचे पालन न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन (मुंबई) सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिला आहे.