कोविड सज्जतेसाठी सिडबीने सुरू केल्या ‘श्वास’ आणि ‘आरोग’ या दोन जलद वितरण योजना

कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे / मोठ्या प्रमाणावर परतल्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला आहे. हॉस्पिटल्सना ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. या परिस्थितीत आपले योगदान देण्यासाठी सिडबीतर्फे, या महामारीला सामोरे जाण्यासाठी क्षमतावृद्धी करून देशाला मदत करण्यासाठी आपल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एमएसएमईंना मदत करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

    मुंबई : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आवश्यक आर्थिक सहाय्यासाठी मदत करण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) प्रसार, वित्तसहाय्य आणि विकासासाठी काम करणाऱ्या प्रधान वित्त संस्थेतर्फे ‘श्वास’ (सिडबी असिस्टन्स टू हेल्थकेअर सेक्टर इन वॉर अगेन्स्ट सेकंड वेव्ह ऑफ कोविड१९) आणि ‘आरोग’ (सिडबी असिस्टन्स टू एमएसएमई फॉर रिकव्हरी अँड ऑरगॅनिक ग्रोथ ड्युरिंग कोविड१९ पँडेमिक) या दोन योजना सुरू केल्या. या योजना भारत सरकारच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या अंतर्गत, ऑक्सिजन सिलिंडर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिमीटर्स आणि अत्यावश्यक औषधांच्या पुरवठ्याशी संबंधित उत्पादन व सेवांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात येते.

    कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे / मोठ्या प्रमाणावर परतल्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला आहे. हॉस्पिटल्सना ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. या परिस्थितीत आपले योगदान देण्यासाठी सिडबीतर्फे, या महामारीला सामोरे जाण्यासाठी क्षमतावृद्धी करून देशाला मदत करण्यासाठी आपल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी एमएसएमईंना मदत करण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

    या प्रसंगी, सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “सध्याच्या निकडीच्या काळात ज्या एमएसएईंनी आपले काम सुरू ठेवले आहे आणि सर्व पातळ्यांवर आरोग्यसुविधा पुरवत आहेत त्या पात्र एमएसएमईंना क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे.”

    कोविड १९ मुळे निर्माण झालेला तणाव आणि राष्ट्रीय पातळीवर आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना सिडबीने, या महामारीशी लढा देण्यासाठी आरोग्य सेवा पुरवठादारांना सहाय्य करण्यासाठी योजना आखल्या आहेत. एमएसएमईकडून सर्व कागदपत्रे/माहिती प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत एमएसएमईंना ४.५०% ते ६% या आकर्षक व्याजदराने रु.२ कोटींपर्यंतच्या रकमेचा १००% निधी उपलब्ध करून देण्याच्या या योजना आहेत. या योजनेचे तपशील www.sidbi.in या आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

    २५ मार्च २०२० रोजी सिडबीने सिडबी असिस्टन्स टू फॅसिलिटेट इमर्जन्सी रिस्पॉन्स अगेन्स्ट कोरोना व्हायरस (सेफ) योजना सुरू केली. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठीची कोणतीही उत्पादने किंवा सेवा पुरविणाऱ्या (हँड सॅनिटायझर्स, मास्क, बॉडी सुट्स, व्हेंटिलेटर्स, चाचणी प्रयोगशाळा इ.) सर्व एमएसएमईंना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोविड-१९ शी लढा देणाऱ्या उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या ४०० हून अधिक एमएसएमईंना आर्थिक वर्ष २०२१मध्ये सेफअंतर्गत (एकूण रु.१७८ कोटी) आर्थिक सहाय्यासाठी मंजुरी देण्यात आली.