लालबाग परिसरात इतिहासात प्रथमच शुकशुकाट, विभागातील रहिवाशांनाच दर्शनाची संधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यातआली आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहोत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी परिसरातील रहिवाशांना दर्शन देण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहोत.

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा छोट्या प्रमाणात आणि साध्या रुपात गणेशाचे आगमन केले आहे. दरवर्षी हजारो आणि लाखोंच्या संख्येने गणेश भक्त लालबाग परिसरात गणेश दर्शनासाठी येत असतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे लालबागमध्ये शतकात पहिल्यांदाच शुकशुकाट पहायला मिळाला आहे. तसेच गणेश मंडळांनी देखील आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लालबागमधील चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अध्यक्ष उमेश नाईक यांनी सांगितले की, चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची दिवस-रात्र गर्दी असायची मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे भक्त नियमांचे प्रशासकीय नियमांचे पालन करत आहेत. मंडळाने देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. तसेच हे वर्ष जन आरोग्य वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यातआली आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहोत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी परिसरातील रहिवाशांना दर्शन देण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहोत. थर्मल तपासणी करुन त्यांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. सोशलडिस्टन्सिंगचा देखील नियम पाळला जात आहे. निर्जंतुकीकरण केले जात आहे. असे उमेश नाईक यांनी सांगितले आहे.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गणेशगल्लीने मुंबईच्या राजाची प्रतिष्ठापना केली आहे. यंदाचे वर्ष या मंडळांनी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने देखील जनआरोग्य वर्ष म्हणून हे वर्ष साजरा करायचा निर्णय घेतला आहे.