मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच खर्चासाठी मोडल्या एफडी, कोरोनावर १३०० कोटींचा खर्च

मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बँकेमध्ये ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच त्या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने १४०० कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा (Corona) प्रकोप वाढला आहे. त्यामुळे कोरोनावरील उपाययोजनांवर खर्च करताना मुंबई महापालिकेचं (BMC)आता कंबरडं मोडल आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला होता. सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) तिजोरीत महसुल  (Revenue) येणे बंद झाले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची तिजोरी साफ झाली आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत आबेत तर दुसरीकडे महसुलाद्वारे येणाऱ्या रक्कमेत तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागला आहे. आतापर्यंत कोरोना संदर्भातील गोष्टींवर सुमारे १३०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एकूण रक्कमेतील ९०० कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत. तर उर्वरीत निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बँकेमध्ये ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच त्या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने १४०० कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे.