कुटुंब कबिल्यासह परप्रांतीयांची पुन्हा गावी निघण्याची तयारी..

    मुंबई : काेणतीही घाेषणा न करता शहर आणि उपनगरातील दुकाने, लहानसान उद्याेग, व्यवसाय करणारे, फेरीवाले, मुंबईतील सर्व बाजारपेठा आज संध्याकाळपर्यंत पालिका कर्मचारी आणि पाेलिसांनी पूर्णपणे बंद केल्या.पहिल्या लाॅकडाऊनचा धसका घेतलेले परप्रांतिय मजूर, हातावर पाेट असलेेले श्रमजीवी पुन्हा हाेणार्या या अघाेषित लाॅकडाऊनने धास्तावले आहेत. राेजी राेटीचा प्रश्न निर्माण झाल्यास उपाशी मरण्याएेवजी आपले गाव गाठलेले बरे, असा विचार पुन्हा परप्रांतियांच्या आणि श्रमजीवींच्या मनात अस्वस्थता निर्माण करीत आहे. त्यामुळे कुटुंब कबिल्यासह परप्रांतीय पुन्हा गावी निघण्याची तयारीत आहेत.

    मुंबईतील मुख्य बाजारपेठ असलेला दादर परिसरातील सर्व दुकाने आज सकाळपासून बंद करण्यास सुरूवात झाली. संध्याकाळपर्यंत बहुतांश दुकाने बंद हाेती. काही दुकाने अर्धवट उघडली हाेती. मात्र दादरमधील दुकानमालकांनी आज या अघाेषित लाॅकडाऊनविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला काेणतीही सुचना न देता अशा पध्दतीने आमच्यावर लाॅकडाऊन लादणे गैर आहे. आमच्या दुकानात झुंबड उडत नाही मग निर्बंध का लादता असा सवाल काही व्यापार्यांनी केला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज काही व्यापार्यांनी निषेधाचे फलक दादर मध्ये झळकावले. दादर रेल्वे स्थानकाचा नेहमी गजबजलेला परिसर आज फेरीवाल्यांना हटवून माेकळा केला हाेता. हा परिसरात पाेलीस आणि पालिका कर्मचार्यांनी ताब्यात घेतला हाेता. सद्या दुकानदार आणि फेरीवाल्यांमध्ये कमालीचा असंताेष निर्माण झाला हाेता.

    मुंबईच्या शहर आणि उपनगरात अशीच परिस्थिती हाेती. सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. दुकाने बंद केल्याने पुन्हा लाॅकडाऊन हाेण्याची भिती सर्वाधिक श्रमजीवी, हातावर पाेट भरणार्या आणि परप्रांतीय मजूराना वाटत आहे. पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास उपासमारीची पाळी येईल, काेराेनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर मुंबई गाठलेले परप्रांतीय आता पुन्हा धास्तावले आहेत. कुटुंबकबिल्यासह गाव गाठावे या विचारात ते असल्याचे दिसून येत आहे. दुकानदार आणि व्यापार्यांना या अघाेषित बंदबाबत काहीही सुचना नसल्याने सर्वच दुकानदार आणि फेरीवाले यांच्यात संताप दिसत हाेते. अचानक सरसकट दुकाने बंद का केली जात आहेत, आम्ही सुचनांचे पालन करीत आहाेत असे दुकानदारांचे म्हणणे आहे. सर्व सामान्य नागरिकांमध्येही काहीशा अशाच समिश्र भावना आहेत. काही आगावू सुचना दिली असती तर बरे झाले असते, अशा प्रतिक्रिया सामान्यातून उमटत आहेत.