१६ सप्टेंबरपासून भरता येणार १७ क्रमांकाचा फॉर्म; दहावी आणि बारावीच्या विदयार्थ्यांना प्रशासनाचे आवाहन

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरायचे आहे.

    मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) (the Secondary School Certificate) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) (Higher Secondary Certificate) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म क्रमांक 17 (Form No 17) भरून परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी अर्ज करता येणार आहे.

    दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरायचे आहे. त्यानंतर मूळ कागदपत्रे 14 ऑक्टोबरपर्यंत संपर्क केंद्र शाळेत जमा करायचे आहेत. तसेच कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

    http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचा अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना सोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो स्कॅन करून अपलोड करायची आहेत.