mp sanjay kakde

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काही दिवसंपासूर्वी ८० वा वाढदिवस झाला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संजय काकडे यांनी लेख लिहिला होता. हा लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाला होता. संजय काकडेंनी पवारांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख लिहिला होता.

मुंबई : भाजपचे माजी खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. संजय काकडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिरवा कंदिल दाखवला आहे. नव वर्षाच्या सुरुवातीला संजय काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काही दिवसंपासूर्वी ८० वा वाढदिवस झाला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संजय काकडे यांनी लेख लिहिला होता. हा लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाला होता. संजय काकडेंनी पवारांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख लिहिला होता. या लेखावरुन संजय काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चा अफवा असल्याचे सांगून संजय काकडेंनी पक्षांतराच्या बातम्यांना पुर्णविराम दिला आहे.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत काकडे भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, पुणे लोकसभेची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडण्यास नकार दिल्याने काकडे यांचा पक्ष प्रवेश टळला होता. आता आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी पुन्हा काकडे यांना राष्ट्रवादी पक्षात घेईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणण्यात काकडे यांचा वाटा मोठा होता. राष्ट्रवादीसह काँग्रेस, मनसे या पक्षातील अनेक विद्यमान नगरसेवक आणि प्रबळ उमेदवार त्यांनी भाजपमध्ये नेले होते, त्याचा फायदा भाजपला झाला होता. विधानसभा निवडणुकीतही शिवाजीनगर, पुणे केंटॉमेन्ट या जागा भाजपकडे टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला खिंडार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग राष्ट्रवादीला होऊ शकतो आणि त्यातून सद्या भाजपमध्ये अडगळीत असलेल्या काकडे यांनाही ताकद मिळू शकते, अशा पद्धतीची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे आता काकडे खरच राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार की भाजपचे कमळच हातात ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.