मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बंदव्दार चर्चेनंतर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेना पक्षश्रेष्ठींचे दिल्लीत पाचारण ! 

पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित आहे.  त्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचे केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो असा कयास माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

  मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांच्यासोबत बंद व्दार चर्चा केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे  हे दिल्लीला रवाना झाले आहेत. नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

  मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राणे यांची भेट

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांच्याकडून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दिल्ली दौ-यानंतरच्या बदल लेल्या वातावरणात भाजप पक्षश्रेष्ठीकडे काही मुद्यांवर दुसरी बाजू मांडली जाणार आहे. मात्र सध्या होवू घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राणे यांची भेट होत असल्याने तर्क विर्तक केले जात आहेत.
   

  उध्दव ठाकरेंचे कट्टर विरोधक म्हणून दिल्लीत पाचारण
  नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अमित शाह हे कोकणात आले होते त्यानंतरही राणे यांचे वजन वाढल्याचा कयास व्यक्त केला जात होता. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी सात त्याने शिवसेना आणि व्यक्तिश: उध्दव ठाकरे यांना टोकाचा विरोध केला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यामागेही त्यांचा शिवसेनेला टोकाचा विरोध हेच कारण असल्याने यावेळी देखील त्यांना राज्यातील चाणाक्ष भाजप नेत्यांनी उध्दव ठाकरे यांचे कट्टर विरोधक म्हणून दिल्लीत पाचारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  आरक्षणप्रश्नी चर्चा करण्याचा पक्षश्रेष्ठींचा मानस
  मात्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ समितीचे प्रमुखपद भुषविलेल्या नारायण राणे यांच्याशी चर्चा करण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही माध्यमांत मात्र त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.असा दावा देखील करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित आहे.  त्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचे केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो असा कयास माध्यमातून व्यक्त केला जात आहे.