माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे वकील इंदरपाल सिंह ED च्या कार्यालयात दाखल

आपल्याविरोधात कारवाई करू नये यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे; अशी माहिती देशमुखांच्या वकिलांनी दिली आहे.

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. त्यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनिल देशमुखांचे वकील इंदरपाल सिंह हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. आपल्याविरोधात कारवाई करू नये यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे; अशी माहिती देशमुखांच्या वकिलांनी दिली आहे.