माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी!

मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांचा पक्षात प्रवेश झाला आहे.

    मुंबई : राज्याचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख (Hemant Deshmukh) यांची आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांचा पक्षात प्रवेश झाला आहे. यावेळी येत्या कालखंडात प्रत्येक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.

    भाजप नेत्यांशी वाद

    शिंदखेड्याचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत पक्ष पातळीवर डॉ. देशमुख यांचे टोकाचे वाद झाले आहेत. डॉ. देशमुख यांनी गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्यांनी राजकारणात घालवला असून, त्यांच्या गळयात मंत्रीपदाची माळ देखील पडली. पण दरम्यानच्या कालावधीत त्यांनी काँग्रेसमधे प्रवेश केला होता. या कालावधीत त्यांनी पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमधे सहभाग नोंदवला. पण, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसीची चर्चा सुरु होती. त्यात आज मुंबई येथे त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला आहे.