माजी मंत्री मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम हे बुधवार ७ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात होणार आहे.

  मुंबई : भारतीय जनता पक्षा विरोधात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मदतीने राजकीय आव्हान निर्माण केले असताना राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काही महिन्यात होणा-या मुंबई महापालिका निवडणुकीची समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशीच्या फे-यात

  गेल्या काही वर्षापासून बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसांच्या प्रकरणात कृपाशंकर सिंह चौकशीच्या फे-यात सापडून राजकीय अडचणीत आले होते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून दूर होते. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह यांच्या घरी जात सिंह यांनी भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवल्याचे दिसून आले होते. मात्र, सिंह यांनी भाजप मध्ये अधिकृत  प्रवेश केला नव्हता तो उद्या होणार आहे.

  25 टक्के मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते

  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत सुमारे २० ते २५ टक्के मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायकही आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा भाजपला फायदाच होणार असून काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  कृपाशंकर सिंग, यतीन कदम यांचा भाजपा मध्ये प्रवेश